अर्जुन आणि रेवथीच्या लव्ह स्टोरीमध्ये सुयश टिळकचा ट्विस्ट

By  
on  

   सोनी मराठी वाहिनीवरील 'जिवाची होतीया काहिली' ही मालिका मराठी आणि कानडी यांच्या प्रेमावर भाष्य करते आहे. प्रमुख नायकाच्या भूमिकेत कोल्हापूरचा रांगडा गडी, अभिनेता राज हंचनाळे प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडतोय. तसेच प्रतीक्षा शिवणनकर हिचा कानडी अंदाजसुद्धा प्रेक्षकांना आवडतो आहे. मराठी रांगडा गडी अर्जुन आणि कानडी भाषिक रेवथी यांची ही प्रेमकहाणी सोनी मराठी वाहिनीवर पाहायला मिळते आहे. सोनी मराठी वाहिनी प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात अग्रेसर आहे. सोनी मराठी वाहिनीवर सुरू असलेल्या 'जिवाची होतिया काहिली' या प्रेमकहाणीला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळते आहे. सध्या मालिका रंगतदार वळणावर येऊन पोचली आहे. अर्जुन आणि रेवथी यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आहे. 
           

  तेवढ्यात आता मालिकेत कार्तिक देवराज या व्यक्तिरेखेचा प्रवेश होणार आहे. कार्तिक देवराज गावातला सरकारी अधिकारी असून कोकटनूर यांचावर त्याची जबाबदारी असेल. कार्तिक देवराज याची भूमिका सुयश टिळक करत आहे. अशा प्रकारची भूमिका सुयशने कधी केली नाही. त्याच्या वेशाची विशेष चर्चा होईल यात शंका नाही. अर्जुन आणि कार्तिक देवराज यांची चांगली मैत्री असेल, पण कार्तिक देवराज ही नकारात्मक व्यक्तिरेखा असेल. तो रेवथी आणि अर्जुन यांच्यात फूट पडण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळेल. कार्तिक देवराज याच्या येण्याने रेवथी आणि अर्जुन यांच्या नात्यावर काय परिणाम होणार, हे पाहणं उत्सुकतेचं असेल.  
               

मराठी रांगडा गडी अर्जुन आणि कानडी भाषिक रेवथी यांच्या या  प्रेमकहाणीमध्ये काही नवे आश्चर्यकारक बदल पाहायला मिळताहेत का, हे पाहायला विसरू नका. पाहा,  'जिवाची होतिया काहिली' सोम. ते शनि. संध्या. 7.30 वा. सोनी मराठी वाहिनीवर.

Read More
Tags
Loading...

Recommended