"स्वामींवर श्रद्धा आणि माझ्यावर प्रेम असंच कायम असुद्या"

By  
on  

कलर्स मराठी वरील जय जय स्वामी समर्थ या मालिकेला संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशाच्या बाहेरून देखील रसिक प्रेक्षकांचे उदंड प्रेम लाभत आहे. मालिकेचे ७५० हून अधिक भाग आता पूर्ण झाले आहेत त्यानिमित्ताने अक्षय मुडावदकर (स्वामी समर्थ) यांनी आपला प्रवास सांगितला.

 

पहिली मालिकाणि स्वामी साकारायला मिळणं काय सांगाल ?

काय आणि किती बोलू...सगळं सगळं दिलंय स्वामींनी...एक कलाकार म्हणून जे जे हवं असतं  ते सगळं दिलंय...ओळख, प्रसिद्धी,मान आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काम करण्याच समाधान. आज माझ्या करिअरची सुरुवात साक्षात स्वामींच्या भूमिकेने व्हावी हा खरंतर मी माझ्या पुढील प्रवासा करिता मिळालेला स्वामींचा आशीर्वाद समजतो आणि त्यांच नाव घेऊन पुढील प्रवासाची सुरुवात करतो...एव्हढच म्हणींन की मी फक्त एक कलाकार आहे जो स्वामींच्या भूमिकेतून त्यांच्या लीला तुम्हा सगळ्यां पर्यंत पोहचवण्याचा फक्त प्रयत्न करतोय...तेव्हा "स्वामींवर श्रद्धा आणि माझ्यावर प्रेम असंच कायम असुद्या"

Read More
Tags
Loading...

Recommended