आई कुठे काय करते ! आशुतोषची बहिण वीणाच्या येण्याने येणार नवं वळण

By  
on  

स्टार प्रवाहच्या आई कुठे काय करते या मालिकेत वीणा या पात्राचा उल्लेख वारंवार येतोय. ही वीणा नेमकी आहे कोण आणि तिची मालिकेत एण्ट्री नेमकी कश्यासाठी होतेय याविषयी प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. ज्या पात्राविषयी इतकं भरभरुन बोललं जात आहे त्या वीणाची लवकरच आई कुठे काय करते मालिकेत एण्ट्री होणार आहे.

वीणा म्हणजे आशुतोषची आत्ये बहिण. आई-वडिलांचं लहानपणीच निधन झाल्यानंतर आशुतोषच्या आई-बाबांनी तिचा संभाळ केला. वीणा खूप मोकळ्या मनाची आहे. तिला प्रवासाची आवड आहे. कोणत्याही गोष्टीत अडकून रहाणं तिच्या तत्वात बसत नाही. म्हणूनच एक दिवस निरोपाची चिठ्ठी देऊन वीणा आशुतोषच्या घरातून निघून गेली. वीणाच्या जाण्याने सर्वांनाच वाईट वाटलं. वीणाचे खुशालीचे फोन येत असत. आता इतक्या वर्षांनंतर वीणा पुन्हा एकदा येतेय.

 

सुप्रसिद्ध अभिनेत्री खुशबू तावडे वीणा ही भूमिका साकारणार असून आई कुठे काय करते मालिकेच्या कुटुंबात सामील होण्यासाठी ती खुपच उत्सुक आहे. या भूमिकेविषयी सांगताना वीणा म्हणाली,  ‘माझ्या आयुष्यातली पहिली मालिका धर्मकन्या मी स्टार प्रवाहवर केली होती. त्यानंतर जवळपास १२ वर्षांनंतर पुन्हा एकदा स्टार प्रवाहसोहत काम करतेय. आई कुठे काय करते ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. यातील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या रोजच्या जगण्याचा अविभाज्य भाग आहे. या लोकप्रिय मालिकेचा भाग होताना अत्यानंद होतोय.

वीणाच्या येण्याने अनिरुद्ध आणि संजनाच्या नात्यात बरीच उलथापालथ घडणार आहे. त्यामुळे आई कुठे काय करते मालिकेचे यापुढील भाग आणखी उत्कंठावर्धक होतील यात शंका नाही. त्यासाठी न चुकता पहा आई कुठे काय करते सोमवार ते शनिवार ७.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.’

Read More
Tags
Loading...

Recommended