आसावरीचं अभिजित राजेंसाठी सरप्राईज, अभिजित राजेंना आता मिळणार हा मान

By  
on  

'अग्गंबाई सासूबाई' मालिकेत आता एक खास गोष्ट पाहायला मिळणार आहे. कारण आसावरी आता अभिजित राजेंना खास सरप्राईज देणार आहे. आसावरीने खास त्यांच्यासाठी नऊवारी साडी नेसली आहे. 

दर 3 वर्षांनी पुरुषोत्तममासात म्हणजेच अधिकमासात जावयाचा विशेष मान असतो आणि तोच मान आता कुलकर्ण्यांचे जावई अभिजित राजेंना मिळणार आहे. आता आजोबा गावी असल्यामुळे आसावरीच जावयाचा मान म्हणून शुभ्रा आणि सोहमकडून अभिजित राजेंचे पाय धुवून घेत आहे. तेव्हा जावयाच्या मानासोबतच अभिजित यांना आता अधिकमासाचं वाणदेखील मिळणार आहे. हा भाग प्रेक्षकांना लवकरच आगामी भागात पाहायला मिळणार आहे.

 'अग्गंबाई सासूबाई' ही मालिका आता प्रचंड लोकप्रिय झाली आहे. या मालिकेने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांचं लक्ष वेधलं. मालिकेतील आसावरी, शुभ्रा, बबड्या, अभिजित राजे ही पात्रे तर प्रचंड लोकप्रिय ठरली आहे. 
 

Read More
Tags
Loading...

Recommended