कोण ठरेल महाराष्ट्राची महागायिका, पाहा सूर नवा ध्यास नवाचा“महाअंतिम सोहळा”

By  
on  

महाराष्ट्राच्याच नाही तर भारतभरातून या स्पर्धेत उतरलेल्या गायिकांमधून १६ सुरेल गायिका ‘सूर नवा ध्यास नवा ‘च्या देदीप्यमान अशा महामंचावर दाखल झाल्या. करोनाच्या या कसोटीच्या परिस्थितीला तोंड देत या १६ जणींनी सुरांचा हा मंच मोठ्या मेहनतीने सजवला, गाजवला आणि अधिकाधिक तेजोमय केला. या १६ सुरेल गायिकांमधून सहाजणींनी महाअंतिम फेरीत मानाचं स्थान मिळवलं. अहमदनगरची सन्मिता धापटे – शिंदे, डोंबिवलीची प्रज्ञा साने, बारामतीची राधा खुडे, पुण्याच्या श्रीनिधी देशपांडे आणि रश्मी मोघे तसेच कोल्हापूरची संपदा माने यांनी अटीतटीच्या या स्पर्धेत आपल्या सुरांनी रसिकांची आणि कॅप्टन्सची दाद मिळवत महाअंतिम फेरीत अव्वल स्थान मिळवलं. या सहाजणींना “सूर नवा ध्यास नवा”च्या या मंचावर खऱ्या अर्थानं आपापला ‘सूर नवा’ सापडला. पण आता कळणार आहे, या सहाजणींपैकी कुणाचा महागायिका बनण्याचा ध्यास खरा ठरतो.. कुणाच्या हाती मानाची सुवर्णकट्यार विराजमान होते आणि कोण ठरतेय, महाराष्ट्राची आशा उद्याची!! 

अवघ्या १६ गायिकांबरोबरच हा प्रवास सुरू झाला परंतु हे सोळाही सूर महाराष्ट्राच्या कानाकानांत, मनामनांत गुंजत राहिले. या गायिकांच्या सुरेल गाण्यांनी अवघ्या महाराष्ट्राला मंत्रमुग्ध केलं, गायिकांच्या सुरांना संपूर्ण महाराष्ट्राने पसंती दिली. विविध शैलींची गाणी अत्यंत सहजतेने सादर करून कॅप्टन्सची आणि महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांची मनं या गायिकांनी जिंकली. मात्र या १६ पैकी सहा गायिकांनी वैविध्यपूर्ण गाणी सादर करून आपली विशेष छाप सोडली आणि महाअंतिम फेरी गाठली.

या रंगतदार महाअंतिम सोहळ्यात “सूर नवा ध्यास नवा” चे लोकप्रिय कॅप्टन्स महाराष्ट्राचा लाडका रॅाकस्टार संगीतकार अवधूत गुप्ते आणि शास्त्रीय संगीताचा वारकरी महेश काळे यांचीही अदाकारी रसिकांना अनुभवता येणार आहे. तसेच या पर्वाचा संगीत समुपदेशक, गायक, संगीतकार अजित परब, तरूणांचा लाडका गायक स्वप्नील बांदोडकर, लोक कलावंत नागेश मोरवेकर यांचे भन्नाट परफॅार्मन्स या सोहळ्याची रंगत वाढवणार आहेत. 

 

तेव्हा या बहारदार, महाअंतिम सोहळ्याच्या सुवर्णक्षणांचे साक्षीदार होऊया… १३ जून संध्याकाळी ७.०० वा. आपल्या कलर्स मराठी वाहिनीवर.

Read More
Tags
Loading...

Recommended