पाहा Photos : संजीवनी रणजीत ढालेपाटीलचा SWAG

By  
on  

कलर्स मराठीवरील राजा रानीची गं जोडी मालिका महाराष्ट्रात तूफान गाजते आहे. संजू आणि रणजीत ढालेपाटील म्हणजेच शिवानी सोनार – मनिराज पवार यांना प्रेक्षकांचे मालिका सुरू झाल्यापासूनच भरभरून प्रेम मिळते आहे. मालिकेतील संजू तिच्या बेधडक आणि बिनधास्त व्यक्तिमत्वासाठी लोकप्रिय आहे. कुटुंब असो वा नोकरी ती तिची जबबाबदारी प्रामाणिकपणे आणि चोखपणे निभावते आहे. मालिका सुरू झाली तेव्हा संजूचा TOKKKK संपूर्ण महाराष्ट्रात फेमस झाले आणि अजूनही फेमस आहे.

संजू PSI झाल्यापसून ती पोलिस चौकीच्या कामात, गुन्हेगारांना शिक्षा देण्यात बरीच व्यग्र असते. आणि यामध्ये संजूला रणजीतची खंबीर साथ मिळते आहे. नुकतचं एका सीनचं शूटिंग सुरू असताना संजीवनी रणजीत ढालेपाटीलचा SWAG बघायला मिळाला. शिवानी म्हणाली, “सध्यस्थिति बघता आम्ही सगळेच बायोबबल मध्ये होतो. त्यामुळे हॉटेलच्या परिसरात मी बुलेट चालवायला शिकले. मनिराजने म्हणजेच रणजीतने मला बुलेट चालवायला शिकवले. त्याच्याकडे त्याची स्वत:ची बुलेट असल्याने थोडं सोपं गेले. अगदी एक – दोन दिवसातच मी शिकले चालवायला”.  

Read More
Tags
Loading...

Recommended