प्रेक्षकांना आपलीशी वाटणारी अश्विनी !

By  
on  

'तू चाल पुढं' या मालिकेतून अभिनेत्री दीपा परब- चौधरी जवळपास दहा वर्षांनी छोट्या पडद्यावर पुनरागमन करते आहे. या मालिकेत ती अश्विनीच्या व्यक्तिरेखेतून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. प्रोमोमध्ये सगळ्यांनी अश्विनीला पाहिलं .या मालिकेबद्दल व आपल्या भूमिकेबद्दल बोलताना दीपा म्हणाली कि, " झी मराठी कडून मला फोन आला. अभिनेत्री हर्षदा खानविलकरने माझे नाव ह्या भूमिकेसाठी टीमला सुचवले. खरंतर कमबॅक करण्यासाठी मी वाटच पाहत होती आणि संधी चालून आल्यावर ती मी लगेच स्वीकारली.

माझी अश्विनी हि भूमिका सर्वसमावेशक आहे. कुटुंबातील सदस्य त्यांचे स्वभाव, समस्या, तिचं घराप्रती कर्तव्य ह्या सर्व गोष्टींची सांगड घालून समंजसपणे घरातील नाती सांभाळून घेते.नवीन घर तयार व्हावं व त्यात आपलं हि योगदान असावं असा विचार करून ती स्वबळावर पैशाची बचत करते. मला विश्वास आहे कि, अश्विनी हि व्यतिरेखा प्रत्येक घरातील महिलेला आपलीशी वाटेल. तर पाहायला विसरू नका 'तू चाल पुढं' १५ ऑगस्ट पासून सोमवार ते शनिवार संध्या. ७.३० वा. फक्त आपल्या झी मराठीवर.

Read More
Tags
Loading...

Recommended