सत्तेसाठी अंतिम लढा! लोकप्रिय सिरीज ‘सिटी ऑफ ड्रीम्‍स’च्‍या तिसऱ्या सीझनची घोषणा

By  
on  

‘सिटी ऑफ ड्रीम्स’चा या बहुचर्चित वेबसीरिजचा पहिला आणि दुसरा सिझन प्रचंड गाजला. सुप्रसिध्द दिग्दर्शक नागेश कुकनूर यांच्या या वेबसिरीजमध्ये प्रतिभावान कलाकार अतुल कुलकर्णी, प्रिया बापट, सिध्दार्थ चांदेकर, सचिन पिळगावकर, सुशांत सिंग, एजाज खान, रणविजय सिंग प्रमुख भूमिकेत आहेत. आता  सत्तेसाठी भूक, विश्‍वासघात आणि सिंहासनावर आरोहित झालेले सर्वात प्रभावी व शक्तिशाली गायकवाड हॉटस्‍टार स्‍पेशल्‍स ‘सिटी ऑफ ड्रीम्‍स’च्‍या तिसऱ्या सीझनसह परतले आहेत.ही सिरीज लवकरच डिस्नी+ हॉटस्‍टारवर पाहता येणार आहे.
 

सीझन ३ बाबत सांगताना दिग्‍दर्शक नागेश कुकुनूर म्‍हणाले, ‘‘‘सिटी ऑफ ड्रीम्‍स’चा सीझन १ व २ लोकप्रिय ठरले आणि प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केले. यामुळे सीझन ३ साठी स्‍तर उंचावला आहे. प्रत्‍येक पात्राचा स्‍वत:चा शोध घेण्‍याचा प्रवास आहे, जे सत्ता मिळवण्‍यासाठी एकमेकांमध्‍ये गुंतून जातात. गुंतागूंतीची पात्रं, वैयक्तिक संबंध आणि काही अनपेक्षित ट्विस्‍ट्ससह ‘सिटी ऑफ ड्रीम्‍स सीझन ३’ राजकारणामध्‍ये सत्ता मिळवण्‍याकरिता अंतिम लढा असेल. डिस्नी+ हॉटस्‍टार व अप्‍लॉज एंटरटेन्‍मेंट हे या सिरीजसाठी प्रबळ सहयोगी आहेत आणि माझ्या दृष्टीकोनाला पाठिंबा देण्‍यासाठी मी त्‍यांचे आभार व्‍यक्‍त करतो.’’ 

मराठी कलाकारांच्या दमदार अभिनयामुळे ही सीरीज प्रचंड गाजली 
 

Read More
Tags
Loading...

Recommended